हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत घोषणा केली. वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या २५ रोजी शेतकरी आंदोलनाला वर्ष पूर्ण होत होते. संसदेत जरी केंद्राचे बहुमत असले तरी आम्हाला हे कायदे मान्य नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यानी आंदोलनाचा लढा उभारला. या भूमिकेचा अखेर विजय झाला. हा ऐतिहासिक विजय आहे, असे शेट्टी यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशात केल्या जात असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची उशिरा का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केला. हे काय युद्ध नाही कि जय पराजय व्हायला.
मोदींनी कायद्याचा निर्णय मागे घेत घेतला. ते स्वतःहून घेतला नाही. अगोदरच निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहाशे शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृत्यूस जबाबदार आहे? शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी झालेत. त्यांच्या आंदोलनामुळेच हे कायदे यशस्वी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत तिन्ही वादग्रस्त असलेले कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. त्यानंआतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.