राष्ट्रपती राजवट लागणं दुर्दैवी – छत्रपती संभाजीराजे

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । राज्यात सत्तास्थापनेचं घोंगडं अजूनही भिजतच पडलं आहे. जर शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाटाघाटींवर विश्वास नव्हता तर त्यांनी आधीच योग्य नियोजन का केलं नाही? हा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेनेसाठी सत्ता-स्थापन करणं अवघड होत चाललेलं असताना राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंतची मुदत दिली होती.

मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेनेला सोबत घेत असल्याची कोणतीच माहिती राज्यपालांपर्यंत पोहचली नाही. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली असून या घटनेमुळे राज्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपकडून राज्यसभेवर खासदारकी मिळालेल्या कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करणं गरजेचं असून त्यानुसारच सत्तास्थापना लवकर व्हायला हवी असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागणं हे दुर्दैवी असल्याचंही संभाजीराजे म्हणाले. राज ठाकरे यांनी या एकूण प्रकाराला नतद्रष्टांचा खेळ म्हणत शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here