नवी दिल्ली । आजच्या काळात 99 टक्के लोकं पैशांच्या ट्रान्सझॅक्शनसाठी एटीएमचा वापर करतात. मात्र बऱ्याच वेळा एटीएम काळजीपूर्वक न वापरल्याने ग्राहकाला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बँक आपल्या ग्राहकांना एटीएमशी संबंधित माहितीबाबत सावध करते. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
त्यात नमूद करण्यात आले आहे की, ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी एटीएमवर ‘cancel’ बटण दोनदा दाबल्यास पिन चोरीला प्रतिबंध करता येतो. हा दावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
PIB फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. असा कोणताही मेसेज RBI ने जारी केलेला नाही. या बातमीची चौकशी केली असता हे स्टेटमेंट खोटे असून ते RBI ने जारी केले नसल्याचे समोर आले.
.@RBI द्वारा कथित रूप से जारी एक मैसेज में दावा किया गया है कि ट्रांजेक्शन से पहले एटीएम पर दो बार 'रद्द करें' दबाने से पिन चोरी को रोका जा सकता है#PIBFactCheck:यह मैसेज फ़र्ज़ी है व #RBI द्वारा जारी नहीं किया गया है
▶️अपने ट्रांजेक्शन को सुरक्षित रखने के लिए गोपनीयता बनाए रखे pic.twitter.com/4MlfanJtWJ
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 10, 2021
एटीएममधून पैसे काढताना एक अतिशय उपयुक्त टीप म्हणजे एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी ‘cancel’ बटण दोनदा दाबा, असा दावा व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये करण्यात आला आहे. जर एखाद्याने तुमचा पिन कोड चोरण्यासाठी कीपॅड सेट केला असल्यास, तो सेटअप रद्द करेल.
तुम्ही फोटो आणि बातम्या देखील पाठवू शकता
PIBFactCheck ची टीम सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा दाव्यांची सतत चौकशी करत असते. तुम्हालाही कोणत्याही बातम्या किंवा फोटोबद्दल शंका असल्यास, तुम्ही +91 8799711259 वर WhatsApp किंवा [email protected] वर ईमेल करू शकता. याशिवाय, तुम्ही ट्विटरवर @PIBFactCheck किंवा /PIBFactCheck Instagram वर किंवा /PIBFactCheck Facebook वर देखील संपर्क साधू शकता.