खाद्यप्रेमींसाठी खुशखबर!! शाकाहारी आणि मांसाहारी थाळीवरच्या किमती झाल्या कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही जेवणाच्या थाळीवरच्या किमती कमी झाल्या आहेत. आता शाकाहारी जेवणाची थाळी 17 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. तर मांसाहारी जेवणाच्या थाळीची किंमत 9 टक्क्यांनी कमी झाली आहे. या दोन्ही थाळीवरचे दर कमी झाल्यामुळे खाद्यप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या ऑगस्ट आणि जुलै महिन्यामध्ये मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही जेवणाच्या थाळीवरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. या काळात टोमॅटोच्या दरात वाढ झाल्यामुळे जेवणाच्या थाळीवरच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली होती. मात्र आता टोमॅटोचे दर स्वस्त झाल्यामुळे पुन्हा जेवणाच्या थाळीवरचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता खाद्यप्रेमींना शाकाहारी आणि मांसाहारी थाळी कमी किमतीत मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना जेवणाचा मनसोक्त आनंद लुटता येईल.

CRISIL च्या मासिक फूड प्लेट कॉस्ट इंडिकेटरमधून समोर आले आहे की, मांसाहारी थाळीच्या किमतीत 9 टक्क्यांनी घट झाली आहे. मधल्या काळात टोमॅटोसोबत कांद्याचे दर देखील वाढल्यामुळे जेवणाच्या थाळीवरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. तसेच बॉयलर चिकनच्या दरामध्ये देखील वाढ झाली होती. परंतु आता या किमतींमध्येच घट झाल्यामुळे मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही जेवणाच्या थाळ्यांवरचे दर कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, सर्व प्रदेशातील खाद्यपदार्थांच्या किमतींच्या आधारे CRISIL घरातील प्लेटची सरासरी किंमत मोजण्यात येते. यातून लोकांच्या जेवणाचा खर्च देखील मोजला जातो. स्वयंपाक घरातील धान्य, कडधान्य, भाज्या, मसाले, खाद्यतेल, ब्रॉयलर चिकन अशा गोष्टींच्या किमतीत घट झाली की थाळीवरची किंमत देखील कमी करण्यात येते.