हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. गेली 17 दिवस हे सर्व कामगार बोगद्यात आडकून राहिले होते. त्यामुळे त्यांना बाहेर दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर काल या सर्व कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व कामगारांशी संवाद साधत बचाव कार्यात सामिल असलेल्या सर्वांच्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट करत म्हणले आहे की, “उत्तरकाशीतील मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावुक करत आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य इच्छितो. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजणांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे”
उत्तरकाशी में हमारे श्रमिक भाइयों के रेस्क्यू ऑपरेशन की सफलता हर किसी को भावुक कर देने वाली है।
टनल में जो साथी फंसे हुए थे, उनसे मैं कहना चाहता हूं कि आपका साहस और धैर्य हर किसी को प्रेरित कर रहा है। मैं आप सभी की कुशलता और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं।
यह अत्यंत…
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2023
त्याचबरोबर, “या बचावकार्याशी जोडलेल्या सर्व लोकांच्या कार्याला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले आहे” अशा शब्दात त्यांनी बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्वांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी गोठवणाऱ्या थंडीत उत्तरकाशी मध्ये 41 मजूर बोगद्यात खणण्याचे काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि त्यात हे 41 मजूर अकडले. या मजुरांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर यंत्रणा कामाला लावली होती. तसेच संपूर्ण देशाचे लक्ष रेस्क्यू ऑपरेशनकडे लागून राहिले होते. अखेर मंगळवारी तब्बल 17 दिवसांनंतर या सर्व कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आले आहे.