शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी अव्वल; पवार- उद्धव ठाकरे ‘या’ क्रमांकावर

0
102
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राजकीय वजन अजूनही कायम आहे. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या भारतातील 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मोदींचे विश्वासू सहकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा दुसरा क्रमांक लागतो.

तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तर चौथ्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर असून उद्योगपती गौतम अदानी सातव्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या क्रमांकावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या आणि देशाच्या अर्थंमंत्री निर्मला सीतारामण दहाव्या क्रमांकावर आहेत.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 16 वा नंबर आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 17 व्या स्थानावर आहेत. भाजप नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या यादीत 83 वे स्थान मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here