पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील शिवाजी महाराज; भाजपच्या माजी आमदाराकडून वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर, हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हंटले आहे. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतो. हा शिवाजी महाराज यांचा सन्मान आहे, असे म्हणत त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे समर्थन केले आहे. तसेच या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांचे समर्थन करत गोयल यांच्या या पुस्तकाबद्दल आकांडतांडव करण्याचं काही कारण नाही असेही त्यांनी म्हंटलय.

सुरेश हाळवणकर म्हणाले की, साडेतीनशे वर्षानंतर शिवाजी महाराजांसारखी युद्धनीती मोदींच्या या काळात अनुभवायला मिळत आहे. भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी शिवाजी महाराजांची शिकवण होती. एखादा शेतकरी जर अडचणीत आला तर शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्याची कल्पना आजपर्यंत कोणालाही सुचली नाही. ती मोदींच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. एखादा गरीब माणूस आजारी असेल तर आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ५ लाखाचा आरोग्य विमा उतरवून कोणत्याही दवाखान्यात उपचार करता येतो.

एकीकडे भाजपचे अनेक नेते आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाची जबाबदारी झटकत असताना भाजपच्या माजी आमदाराकडून मात्र समर्थन व्यक्त करण्यात आलं आहे. कोल्हापूरात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवड कार्यक्रम प्रसंगी सुरेश हाळवणकर यांनी हे विधान केलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. भाजपचा त्या पुस्तकाशी काही संबंध नाही असे म्हंटले होते. तसेच भाजपने हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती. वरिष्ठ नेत्यांकडून या पुस्तकाविरोधात बोलले जात असताना भाजपच्या माजी आमदारांकडून या पुस्तकाचे समर्थन केले जात आहे.

Leave a Comment