कराडातील कार्यक्रमांचे अजितदादांना निमंत्रण नाही, कारण…; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं

Prithviraj Chavan Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह आदींसह काही शासकीय कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. कराडमध्ये काही शासकीय कार्यक्रम आहेत तर काही राजकीय आहेत. हा शासनाचा प्रश्न आहे कि तो कार्यक्रम कसा घ्यायचा आणि कुणाला बोलवायचे हे त्यांनी ठरवायचं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रम ठरवला गेला आहे तो कसा करायचा ते त्यांच्यावर आहे, असे चव्हाण यांनी म्हंटले.

कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त म्हणाले की, अजित पवार यांना काही शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. मुख्यमंत्र्यांचे आजचे काही कार्यक्रम हे शासकीय आहेत तर काही राजकीय आहेत. शासकीय कार्यक्रमांचे नियोजन हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून केले जाते. त्यांनी कशा प्रकारे नियोजन केले आहे हा त्यांचा प्रश्न आहे.

आज मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे याबद्दल किनलाही दुमत नाही. आता नवीन सरकार आले आहे. ते याकडे पुन्हा लक्ष देतील आणि औद्योगिकरण झाल्याशिवाय मराठवाडा, विदर्भाचा मागासलेपणा जाणार नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील प्रकल्प हे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नयेत आणि महाराष्ट्रातच राहावेत याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. त्यामध्ये सरकारची मोठी भूमिका असते. आता केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी एका विचारांचे सरकार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रकल्प आणून मराठवाड्याचा, विदर्भाचा, पश्चिम महाराष्ट्रातील मागासलेल्या भागांचा विकास करावा, अशी आमची मागणी असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले.