विरोधकांकडून बाजार समिती लाटण्याचा प्रयत्न; पृथ्वीराजबाबांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड बाजार समितीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत पॅनेलच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी कधीही सहकारी संस्था निवडणूकीत भाग घेत नाही. परंतु काही स्वार्थी, धनदांडगे लोक यामध्ये उतरले आहेत. स्वर्गीय विलास काकांनी ही संस्था सक्षम चाललेली आहे मात्र सत्तेच्या लालसेपोटी विरोधक ही आर्थिक संस्था विरोधक गिळंकृत करु पाहत आहेत, त्यांना योग्य जागा दाखवा अशी जोरदार टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

वसंतगड ता.कराड येथे लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलचा तांबवे सुपने जिल्हा परिषद गट कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधक पैसाचा वापर सत्ता घेण्यासाठी करत आहेत. उत्तर व दक्षिण ची टोळी एकत्र येऊन ही संस्था लाटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना योग्य जागा दाखवा. बाजार समिती ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे ती सर्वसामान्य लोकांच्याकडे राहील पाहिजे. आपले उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. चाळीस वर्षे ही संस्था कांकानी चांगली चालवली आहे. इथून पुढे ती उदयसिंह पाटील सुद्धा सक्षमपणे चालवतील. त्यामुळे विरोधकांच्या अमिषाला आणि भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

यावेळीअँड उदयसिंह पाटील म्हणाले, बाजार समितीचे जडणघडण करण्यामध्ये काकांचं योगदान मोठे आहे. त्यांनी समाजकारण करताना सर्व सामान्य लोकांच्या विचार केला. सरंजामशाहीला विरोध केला आणि सतेच विकेंद्रीकरण केले. आज विरोधक सक्षम चाललेली संस्था गिळंकृत करू पाहत आहे. माणसांचं मत पैशाने विकत घेत आहेत. सत्तेसाठी खालच्या पातळीवर विरोध जात आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती रघुनाथराव नलवडे होते. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अँड उदयसिंह पाटील, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील चिखलीकर, सज्जन यादव, रयत कारखाना संचालक शिवाजी गायकवाड, बाजार समिती माजी सभापती विजय कदम ,अशोक पाटील पोतलेकर, सरपंच तुकाराम डुबल,प्रकाश पाटील, पैलवान सचिन मोहिते, खरेदी विक्री संघाचे संचालक हणमंतराव चव्हाण, जगदिश पाटील.अशोकराज उद्योग समूहाचे शरद चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.