माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारावाराला शिवीगाळ, धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. सरपंचपदासाठी सख्ख्या चुलत्या-पुतण्यात लढत होत आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाचे सरपंपदाचे उमेदवार दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी यांना भोसले गटाच्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की करून धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेठरे बुद्रुक गावाची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून सरपंच पद खुल्या प्रवर्गाला जाहीर झाले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून गावात सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच सुरु झाली आहे. यावेळी कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय (आबा) अशोकराव सूर्यवंशी तसेच अतुल भोसले गटाचे उमेदवार हणमंत बाबुराव सूर्यवंशी या दोन सख्ख्या चुलत्या पुतण्यात हाय व्होल्टेज लढत होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत भोसले गटाचे समर्थक हेमंत पांडुरंग धर्मे यांनी सरपंच पदाचे उमेदवार आबा सूर्यवंशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना रेठरे बुद्रुक येथील बालाजी नगर परिसरात प्रचार करताना फिरत असताना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली.

यावेळी उमेदवार आबा सूर्यवंशी यांनी गावाच्या विकासासाठी अशा धमकींना बळी पडणार नाही व हुकूमशाहीला प्रतिकार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे म्हणत प्रचार चालूच ठेवला व साथीच्या उमेदवारांना लढण्याची प्रेरणा दिली. तसेच हल्लेखोरांवर कराड येथे जाऊन गुन्हा दाखल केला. त्यानुसार कराडचे डीवायएसपी यांनी खबरदारी घेत या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देत गुन्हा नोंद केला व रेठरे बुद्रुक येथे दोन्ही गटाच्या उमेदवारांची तात्काळ मिटिंग घेतली.