कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
दिवसभर ट्रॉफिक पोलिस उभे असतात, मात्र रात्री या खासगी वाहनांच्यावर कोणत्याही प्रकारचा वचक नसतो. त्यामुळे हम करे सो कायदा अशा पध्दतीने वाहने उभी असतात. यावर पोलिस कधी कारवाई करणार? असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे.
कराड शहराचे मुख्यद्वार असणाऱ्या कोल्हापूर नाका येथे रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. सायंकाळी पाच वाजलेपासून रात्री १२ वाजेपर्यंत खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक मनमानी पध्दतीने वाहने उभी करत आहेत. तसेच या मनमानीपुढे चक्क पोलिसांनी हतबलता स्विकारली असल्याची चर्चा प्रवाशांच्यात होताना दिसत आहे. कारण या खासगी ट्रॅव्हल्सवरती कोणताच वचक नसल्याचे येथील अस्थाव्यस्त वाहतुकीवरून दिसून येते.
कराड शहारातून मोठ्या प्रमाणावर लोकांची मोठमोठ्या शहरात ये- जा होत असते. तसेच येथे कराड पाटण तालुक्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह परराज्यातील वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स येथून प्रवासी घेवून जात असतात. यामुळे कोल्हापूर नाका येथे दररोज शेकडो खासगी बसेस येत असतात. तसेच एसटी बसेसही येथूनच बाहेरील जिल्ह्यात व ग्रामीण भागात ये- जा करत असतात.तसेच खासही वडापही येथेच उभे असते. यामुळे लोकांना येथून ये- जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा येथे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोल्हापूर नाका येथे वाहतूक वाढली आहे. येथे दिवसभर ट्रॉफिक पोलिस उभे असतात, मात्र रात्री या खासगी वाहनांच्यावर कोणत्याही प्रकारचा वचक नसतो. त्यामुळे हम करे सो कायदा अशा पध्दतीने वाहने उभी असतात. यावर पोलिस कधी कारवाई करणार असा सवाल नेहमीच लोकांच्यातून केला जात आहे. या खासगी वाहनांच्यावर कोणताच वचक नसल्याने मनमानी पध्दतीने वाहने उभी करणे, वाहतुकीचा खोळंबा करणे असे प्रकार नेहमीच पहायला मिळतात. तेव्हा आता यांना शिस्त कोण लावणार असा प्रश्न नेहमीचाच आहे.