हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. नुकत्याच ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रियांका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. हरियाणातील एका जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळेच प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अनिवासी भारतीय (एनआरआय) उद्योगपती सी.सी. थंपी यांच्याशी संबंधित असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील समावेश केला आहे. यापूर्वी पती रॉबर्ट वाड्रा नाव ईडीने आरोपपत्रात दाखल केले होते. परंतु आता ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रॉबर्ट वाड्रा आणि मुलगी प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिल्लीतील रिअल इस्टेट एजंटच्याद्वारे हरियाणामध्ये जमीन खरेदी केली होती. संबंधित एजंटने ही जमिन थंपी यांना विकली होती.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा आणि थंपी यांच्यात काही व्यवहारिक संबंध असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. वास्तविक पाहता,, 2016 मध्ये या प्रकरणाचे धागेदोरे थेट ब्रिटनला पळून गेलेल्या संजय भंडारीशी जोडलेले आहेत. याच प्रकरणांशी आता प्रियंका गांधी यांचे नाव देखील जोडले गेले आहे. त्यामुळे ईडीकडून प्रियंका गांधी यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.