हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध राजनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या मात्र प्रशांत किशोर यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश होऊ शकला नाही याबाबत प्रियांका गांधी याना विचारले असता त्यांनी यामागील कारण सांगितलं
प्रियांका गांधी म्हणाल्या, “प्रशांत किशोर आणि काँग्रेसची भागीदारीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही भागीदारी होऊ शकली नाही. यामागे अनेक कारणं होती. काही कारणं त्यांच्याकडून होती, तर काही कारणं आमच्याकडून होती. मी त्याच्या तपशीलात जाऊ इच्छित नाही. काही मुद्द्यांवर सहमत होणं शक्य नव्हतं त्यामुळे भागीदारीची ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही.”
दरम्यान, काँग्रेस मध्ये प्रवेश नाही होऊ शकल्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती . देशातील प्रमुख विरोधी पक्ष होण्याचा दैवी अधिकार काँग्रेसला मिळालेला नाही असे म्हणत काँग्रेसने गेल्या १० वर्षात ९० टक्के निवडणूका हरलेल्या आहेत शी टीका त्यांनी केली