बॉलीवूडमध्ये परतण्यासाठी प्रियंका सज्ज

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनोरंजन|प्रियंका चोप्रा हॉलीवूड मधून परत एकदा बॉलीवूड मध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियंका ‘द स्काय इज पिंक’मध्ये दिसणार आहे. या सिनेमातून प्रियंका तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. यात ती जायरा वसीमच्या आईची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द स्काई इज पिंक’चे शूटिंग संपल्यानंतर रॅपअप पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता या सिनेमाशी संबंधीत एका वेगळी माहिती समोर येतेय. सिनेमाचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच प्रियंकाचा सिनेमातला लूक लीक झाला आहे. प्रियंकाच्या फॅन क्लबच्या पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे आणि या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोमध्ये प्रियंका स्टायलिश अंदाजात सेमी-फॉर्मल ड्रेसमध्ये दिसतेय.

‘द स्काय इज पिंक’ सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते. या सिनेमात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे.फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा या सिनेमा मध्ये आई- वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये करण्यात आले आहे. प्रियंकाचे फॅन या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. ‘द स्काय इज पिंक’ सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here