हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : नोकरी करत असलेल्या प्रत्येकाकडे PF खाते असण्याची शक्यता असते. या PF खात्यामध्ये रिटायरमेंटसाठीची रक्कम जमा केली जाते. त्याची जबाबदारी EPFO च्या हाती आहे. रिटायरमेंटनंतर पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम आपल्याला दिली जाते. मात्र जर एखाद्या PF खातेधारकाचा रिटायरमेंटपूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत जमा असलेल्या रकमेचे काय होईल ???
या परिस्थितीत, PF मध्ये जमा केलेली रक्कम खातेदाराच्या नॉमिनीला दिली जाईल. त्यामुळे, EPFO कडून कधीकधी खातेधारकांना ई-नॉमिनेशन दाखल करण्यासाठी रिमाइंडर दिले जाते. याद्वारे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना ही रक्कम सहजरित्या मिळेल. यासाठी लवकरात लवकर ई-नॉमिनेशन दाखल करावे.
अशा प्रकारे दाखल करा ई-नॉमिनेशन
सर्वांत आधी EPFO च्या https://www.epfindia.gov.in/ वेबसाइटवर जावे लागेल.
येथे UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
आता Services टॅबवर जा आणि ‘For Employees’ वर क्लिक करा.
येथे मॅनेज टॅबवर ई-नॉमिनेशन निवडावे लागेल.
त्यानंतर तुमचा पर्मनंट आणि तात्पुरता पत्ता टाका.
फॅमिली डिक्लेरेशन बदलण्यासाठी ‘Yes’ वर क्लिक करा.
त्यानंतर Add Family Details वर क्लिक करा. येथे एकापेक्षा जास्त नॉमिनी एंटर करू शकता.
आता तेथे नॉमिनीच्या फोटोसह इतर डिटेल्स एंटर करा. त्यानंतर Save करा.
त्यानंतर proceed वर क्लिक करा आणि आधार क्रमांक टाका.
मोबाईलवर एक OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.
ई-नॉमिनेशन दाखल करण्याचे काय फायदे जाणून घ्या
ई-नॉमिनेशन दाखल करून PF बॅलन्स जाणून घेता येईल. याशिवाय अनेक ऑनलाइन सुविधा देखील मिळतील. एकापेक्षा जास्त व्यक्तींना नॉमिनी करून, आपण नसताना आपल्यावरील अवलंबितांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करता येते.
हे पण वाचा :
Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल
फिजिकल गोल्डप्रमाणे Sovereign Gold Bonds वर देखील कर्ज मिळेल का ???
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, आजचे नवे दर तपासा
‘या’ कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो Life Insurance क्लेम !!!
Train Cancelled : आजही रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे तपासा ट्रेनचे स्टेट्स