Wednesday, October 5, 2022

Buy now

फलटणला हाॅटेल ज्ञानराजमध्ये वेश्या व्यवसाय, दोघांना अटक

फलटण | फलटण तालुक्यातील वडजल गावाच्या हद्दीमध्ये फलटण – लोणंद रोडवरील हॉटेल ज्ञानराज अँड लॉजिंगच्या इमारतीमध्ये पश्चिम बंगाल येथील महिलेस वेश्या म्हणून शरीरसंबंधासाठी गिर्‍हाईकांना पुरवीत असल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रवीण रंगराव पवार (वय- 32, रा.विडणी, ता. फलटण), अर्जुन जयसिंग बर्गे (वय- 37, रा. चिचनेर, ता. जि. सातारा) व हॉटेल ज्ञानराजचे मालक यांनी हॉटेल ज्ञानराज या ठिकाणी महिलेस वेश्या म्हणून शरीरसंबंधासाठी गिर्‍हाईकांना पुरवीत असताना मिळून आलेले आहेत. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि, दि. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील वडजल गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या हॉटेल ज्ञानराज अँड लॉजिंग मध्ये लॉजिंग खोल्यांचा वापर कुंटणखाना करित असून त्या ठिकाणी वेश्या व्यवसायाकरीता हॉटेलच्या खोल्या भाड्याने देत आहे. या गुन्ह्याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत.