परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण; न्यायालयाच्या निर्णायाने दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा आरोप करून गायब झालेल्या माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.

परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत जीवाला धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. परमवीर सिंह फरार नाहीतय मुंबई पोलिसांची दहशत असल्यामुळे समोर येत नाहीत असा दावा वकिलांनी केला.

परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या. दरम्यान, परमवीर सिंह हे गायब असल्याचा बातम्या येत होत्या. मागील सुनावणी वेळी न्यायालयाने परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल करत त्यांचा ठिकाणा विचारला होता. त्यावर वकिलांनी ते भारतातच असल्याचं सांगितलं होत.

Leave a Comment