सदावर्ते भाजपचं पिल्लू, त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुणरत्न सदावर्ते भाजपचे पिल्लू असून त्याला महाराष्ट्र तोडायचा आहे अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी सदावर्ते यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आज सोलापुरात सोमनाथ राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत सदावर्तेंवर शाईफेक केली यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शाईफेकीचे कारण सांगितलं.

सोमनाथ राऊत म्हणाले, आज भारतीय संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहु महाराज आणि सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यामुळे सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. सदावर्तें भाजपचे पिल्लू आहे. भाजपला महाराष्ट्र तोडायचा आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही, कारण संभाजी ब्रिगेड ही चळवळ जिवंत आहे असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत काही जणांनी त्यांच्या अंगावर शाईफेक केली. शाईफेकीनंतर सदावर्ते यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. संविधान दिनी संविधानाबाबत बोलताना, छत्रपतींबाबत बोलताना अशी शाईफेक करण्यात आली. ही काळी शाई छत्रपतींच्या प्रतिमेवरही पडली. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का? असा सवाल त्यांनी केला.