नवी दिल्ली । कोरोनाच्या लढ्यात भारत आत्मनिर्भर बनला आहे. कोरोनाच्या लढाईत महत्वाचे साधन असणारे पीपीई कीट उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला आहे. कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास पीपीई कीट चिलखताची भूमिका बजावत आहे. कमालीची बाब म्हणजे केवळ दोन महिन्याच्या कालावधीत भारत सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला आहे.
सरकारने गुरूवारी याबाबत माहिती दिली आहे की,भारत दोन महिन्यात सर्वात कमी वेळीत स्वतंत्र पीपीई कीट बनवणारा जगातील दुसरा निर्माता ठरला आहे. भारताच्या अगोदर चीन आहे ज्यांनी सर्वाधिक पीपीई कीटची निर्मिती केली आहे. पीपीई कीटच्या निर्मितीत आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याच कारणामुळे भारतात दोन महिन्यापेक्षा कमी काळात पीपीई सर्वाधिक तयार करणारा दुसरा निर्माता ठरला आहे. दर्जेदार पीपीई कीटची निर्मिती ही उत्कृष्ट दर्जाच्या कंपनीकडेच दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना वॉरिअर्सना ही पीपीई कीट देण्यात येणार आहे.
दरम्यान, देशातील कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजारांपेक्षा वर गेली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार आता एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 आहे. यापैकी 3583 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 48 हजार 534 लोकं बरे झाले आहेत. अशा वेळी कोरोनाला तोंड देण्यासाठी भारताला आणखी पीपीई कीटची गरज भासणार आहे. जेणेकरून कोरोना वॉरिअर्स आणखी जोमाने कोरोनाला हद्दपार करण्याची लढाई लढू शकतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”