कराड | सातारा जिल्ह्यातील काॅग्रेसमधील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर एका व्यासपीठावर आले. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटका बसला होता. हे दोन्ही गट काॅग्रेसच्या मेळाव्या निमित्त एकत्र आले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसमध्ये सक्रीय होण्याचा निर्धार केला.
“विधानसभा निवडणुकांच्या वेळी उदयसिंह आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. यामुळे पक्षाची ताकद क्षीण झाली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या गुरु-चेल्याने राज्यातील दोन्ही काँग्रेस (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) 40 नेते फोडले. साम दाम दंड भेद वापरुन अनेक पक्ष फोडले” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या गुरु-चेल्याने राज्यातील दोन्ही काँग्रेसचे चाळीस नेते फोडले. विलासकाका उंडाळकर यांनाही आमिष दाखवलं” पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच “ज्यांना काँग्रेसची परंपरा आहे त्यांनी काँग्रेस पक्ष सुधारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विलासकाकांनाही आमिष दाखवले. काकांना स्वातंत्र्य सैनिकी परंपरा आहे. ते आमिषाला बळी पडले नाहीत” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“सर्व मिळून आता सातारा जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती सुधारणार आहोत. आजच्या मेळाव्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरली आहे. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी सुरु केलेले उद्योग पुन्हा सुरु राहिले असते, तर राज्याचे फार नुकसान झाले असते. म्हणून दगडापेक्षा वीट मऊ या हिशोबाने शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’