पृथ्वीराज चव्हाणांनी कोरोना ग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
इराणमधील कोरोना ग्रस्त तेहरान येथे महाराष्ट्रातील 44 लोक अडकले असुन अडकलेल्या यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. तसेच चव्हाण त्यांच्या मदतीची मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी इराणच्या तेहरान येथील परिस्थितीची माहिती घेऊन यात्रेकरूंच्या सुटकेसाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करु अशी ग्वाही यात्रेकरूंच्या नातेवाईकांना दिली आहे.

दरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे कोरोना व्हायरस चा फैलाव वेगाने होत आहे, तेथील अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत, अशा ठिकाणी भारतातील काही 500 ते 600 लोक तेहरान येथे अडकले आहेत. तेथे महाराष्ट्रातील जवळपास 44 नागरिक अडकले असल्याची माहिती आहे, महाराष्ट्रातील हे नागरिक हज यात्रेसाठी निघाले होते. त्याच दरम्यान कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे महाराष्ट्रातील 44 लोक तेहरान येथे अडकले आहेत.
हे सर्व यात्रेकरू कोल्हापुरातील साद ट्रॅव्हल्स या कंपनीच्या माध्यमातून गेले आहेत.

त्यामधील कोल्हापूरचे एस एस मोमीन या वयस्कर प्रवाशांचा मुलगा रफिक मोमीन यांनी आज माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन प्रसंगाची माहिती दिली. नंतर पृथ्वीराज बाबांनी इराणच्या तेहरान येथील परिस्थितीची माहिती घेतली व मोमीन यांच्या कुटूंबियांना आधार दिला.

Leave a Comment