रस्त्यावरुन निघालेल्या 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात घुसली सळई; Video व्हायरल

pune crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील मुंढवा येथे एका 12 वर्षीय मुलाच्या डोक्यात थेट उंचावरुन पडलेली सळई घुसल्याचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हि घटना अत्यंत धक्कादायक आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पुण्यातील मुंढवा येथील एका इमारतीवरून केबल ओढण्याचे काम सुरू होते. याच वेळी त्या इमारतीच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरुन एक 12 वर्षाचा मुलगा जात होता. यावेळी अचानक इमारतीच्या वरच्या भागातून पडलेली सळई थेट मुलाच्या डोक्यात घुसली. हि घटना एवढ्या पटकन घडली कि कोणाला काही कळलेच नाही. त्या मुलालादेखील नेमके काय घडले हे समजले नाही. यामुळे तो डोक्यात घुसलेली सळई घेऊन काही पावलं तसाच पुढे गेला आणि नंतर जमिनीवर जाऊन कोसळला. या प्रकरणी राजेश भारती याच्यासह दोन कामगारांविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना 28 डिसेंबर 2021 रोजी घडली आहे. या जखमी मुलाचे नाव चेतन असे आहे. चेतन घटनेच्या दिवशी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पायी चालत जात होता. यावेळी इमारतीवर केबल ओढण्याचे काम सुरू होते. पण काही समजण्याच्या आतच त्याच्या डोक्यात थेट लोखंडी सळई घुसली. यानंतर तो काही क्षणात खाली कोसळला. यानंतर तेथील नागरिकांनी त्याला उचलून तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलाची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी राजेश भारती याच्यासह दोन कामगार विरोधात मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच चेतनच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रस्त्यावरुन जाताना थेट मोठी सळई चेतनच्या डोक्यात घुसल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. चेतनला तातडीने उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रकरणातील दोषी कामगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चेतनच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.