पुण्यात २४ वर्षीय इंजिनिअर तरुणाची ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुणे जिल्ह्यातील मोशी येथे एका इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत त्याने ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने त्याच्या व्हाट्सअप ला स्टेट्स ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचे नाव अक्षय पोतदार आहे. सातारा जिल्ह्यातील चिखली या गावचा हा तरुण होता त्याचे वय २४ वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या सोसायटीतील इमारतीवरून उडी घेत अक्षयने आत्महत्या केली, तिथे तो राहण्यास नव्हता.

त्याने मृत्यूपूर्वी आई, बाबा आणि बहीणला सांभाळ मी दुसऱ्या जगात जात आहे, अशा आशयाचे व्हाट्सअप स्टेटस् ठेवले असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अवघ्या २४व्या वर्षी त्याने आपले जीवन संपवल्याने त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. संचारबंदी सुरु झाल्यापासून तो सातारा येथील आपल्या मूळ गावी गेला नसल्याची माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे.

अक्षय हा चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसह राहण्यास होता. तो एका खासगी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत होता. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोशी येथील ‘वुड्स व्हिला’ फेज तीन सोसायटीत तो आला. या इमारतीच्या टेरेसवर काम असल्याचे सुरक्षा रक्षकाला सांगत त्याने चावी मागितली. परंतु, सुरक्षा रक्षकाने चावी देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळ वाट पाहून दुसरा सुरक्षा रक्षक येताच इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये जायचे असल्याची नोंद करून त्याने इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने इमारतीच्या अकराव्या मजल्यावर जाऊन तेथून थेट खाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, ज्या फ्लॅटची नोंद त्याने रजिस्टरमध्ये केली तो गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Leave a Comment