Tuesday, June 6, 2023

पुणे- बेंगलोर महामार्ग अखेर 4 दिवसांनी सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अखेर सुरू करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 दिवसांपासून बंद करण्यात आला होता. अखेर परिस्थिती थोड्यापार प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक पूर्वरत करण्यात आली आहे. केवळ आपत्कालीन वाहनांसाठीच महामार्ग सुरु करण्यात आला आहे

गेल्या शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यानंतर प्रथमतः पुणेकडे जाणारा रस्ता बंद करुन एकाच रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरू केली होती. तर काही कालावधीतच पाण्याची पातळी वाढल्याने सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. गेली चार दिवस या महामार्गावरून वाहतूक बंद होती.

आज सकाळी ही वाहतूक सुरु झाली. यामुळे महामार्गावर अडकून पडलेली वाहने मार्गस्थ होत आहेत. दरम्यान, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगूर फाट्यानजीक आलेले पुराचे पाणी ओसरले आहे. यामुळे पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्ग मोकळा झाला आहे.