पुणे – बंगलूर महामार्गावर वाहतुक कोंडी; 30 कि.मी वाहनांच्या रांगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे- बेंगलोर महामार्गावर कोरोना बंदी दोन वर्षानंतर हटल्यामुळे ग्रामीण भागात सध्या चैत्र महिन्यातील यात्रांचा हंगाम मोठ्या प्रमाणावर आहे. दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या जोतिबा देवाची यात्राही सध्या सुरु आहे. जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस उद्या शनिवारी दि. 16 रोजी असल्याने पुणे-बंगलोर महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे गेल्या 4 ते 5 तासापासून ट्राफिक जाम झाली आहे. कोल्हापूर- सातारा या मार्गावर जवळपास 25 ते 30 किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

कोल्हापूर येथील ज्योतिबा देवाची यात्रा दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त होऊन भरत आहे. त्यामुळे लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर यात्रेसाठी निघाले आहेत. चालू वर्षी यात्रेसाठी विक्रमी भाविक जोतिबा डोंगरावरती दाखल होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी डोंगरावरती पोहोचण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.

कासेगाव येथे बर्निंग कार

महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहने नादुरुस्त झाल्याचंही अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे. कासेगाव येथे सर्विस रस्त्यावरती एका चार चाकी पेट घेतल्यामुळे सर्विस रोड बंद करण्यात आला होता. सर्व रस्ते बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांनाही महामार्गा चा वापर करावा लागत आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.

कराड कोल्हापूर या मार्गावरती सायंकाळी सहा वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. शनिवारी दिनांक 16 रोजी ज्योतिबा देवाचा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने वाहतूक कोंडी महामार्गावरील कधी सुटेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. तर हायवे हेल्पलाइन यांच्याकडून साधारणता मध्यरात्रीनंतर वाहतूक कोंडी सुटेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment