मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुळची पुण्याची असलेल्या आदिती पतंगेने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021-22’ हा मानाचा किताब पटकावला आहे. या महाराष्ट्रच्या लेकीने भारताचा झेंडा साता समुद्रापार फडकवला आहे. देशासाठी ही कौतुकस्पद गोष्ट आहे.
आदिती पतंगे विषयी माहिती
आदिती ही मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात सियाटल या ठिकाणी हि स्पर्धा पार पडली होती. आदितीने मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यानंतर आदिती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली, तिथे आदितीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. यानंतर ती मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करू लागली.
https://www.instagram.com/p/CXcYDodlIej/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
आदितेने या स्पर्धेत ‘बेस्ट स्माईल’चा किताब पटकावला आहे. तिने तिच्या इन्स्टावर काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमधील तिची स्माईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आदितीला लहानपणापासून अभिनया व मॉडेलिंगची आवड होती. कोरोनाच्या काळात घरातून काम करून अदितीने अम्पॉवरींग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021-22’ स्पर्धेत भाग घेतला. यातील 22 स्पर्धकांमधून तिला पहिला क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेतील यशानंतर अदिती ऑगस्ट 2022 मध्ये नॅशनल लेव्हल ‘मिस इंडिया युएसए’ मध्ये वॉशिंग्टनची प्रतिनिधी म्हणून भाग घेणार आहे.