पुण्यातील हॉटेल ड्रीमलँडला भीषण आग; बघ्यांची एकच गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे स्टेशन परिसरात असलेल्या हॉटेल ड्रीमलँडला बुधवारी रात्री उशिरा आग लागली आहे. आगीचं कारण अद्यापही समजू शकलं नाही. परिसरात आगीचा डोंब उसळल्याने बघ्यांची एकच गर्दी केली जमली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीच्या ज्वालांचा दाह ३० मीटर अंतरापर्यंत पसरला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्नशील असून आगीचा आवाका प्रचंड असल्याने आग नियंत्रण करण्यात अडथळा येत आहे. हॉटेलमध्ये कुणी अडकलेलं नाही ना याची चौकशी करणं सुरू असून बचवकार्याने वेग घेतला आहे. कसबा, शिवाजीनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.