पुण्यात बसचालक आणि दुचाकीस्वारामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; पहा Video

pune bus driver and two wheeler clash
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात आधीच वाहतुकीचा खोळंबा असताना पीएमपीएल बस चालक आणि दुचाकीस्वार तरुणांमध्ये फ्री स्टाईल तुंबळ हाणामारी झाली आहे. भर रस्त्यात झालेल्या या हाणामारीचा विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीएमपीएल चालकाने दुचाकीला ओव्हरटेक केल्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. दोघांमध्ये एकमेकांच्या चुका सांगत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झालं. दोन्ही तरुणांनी चपलेने बस चालकाला मारहाण केली. त्यानंतर वाहकाने देखील या भांडणात उडी घेतली आणि दोन्ही तरुणांना मारण्यास सुरुवात केली. आसपासच्या लोकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते.

बस चालक आणि दुचाकी स्वराच्या हाणामारीमुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ही तुफान हाणामारी प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात शूट केली. या प्रकरणी घटनेची नोंद बंडगार्डन पोलीस चौकीत करण्यात आली आहे. दोन्ही तरुणांना अटक केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.