लॉकडाऊन लग्न! चक्क बाप म्हणून पोलिसांनीच केलं कन्यादान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळं राज्यासह देशात लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्याच्या एकदिवसआधीच लॉकडाऊनमध्ये आणखी दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली. या वाढत्या लॉकडाउनच्या कालावधीचा सर्वात जास्त भावनिक फटका कोणाला बसत असेल तर तो म्हणजे लग्न जमलेल्या जोडप्यांना. लॉकडाउनच्या कालावधीत सर्व काही बंद त्यात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी त्यामुळं लग्न जमलेल्या जोडप्यांचा एकत्र येण्याआधीच विरह सहन करावा लागत आहे. दरम्यान, यावर मात करत काही जोडप्यांनी आपलं लग्न उरकल्याच्या भन्नाट घटना लॉकडाऊनमध्ये समोर येत आहेत. पुण्यात सुद्धा असंच एक लॉकडाऊन लग्न पार पडलं. कमालीची बाब म्हणजे खुद्द पुणे पोलिसांनी वधू पित्याचं कर्तव्य पार पाडत कन्यादान करून हे लग्न पार पाडलं.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. या दरम्यान आयटी इंजिनिअर असलेल्या आदित्य बिश्त आणि डॉक्टर असलेल्या नेहा कुशवाह यांचा विवाह पुण्यातील अमोनोरा क्लबमध्ये पार पडला. असून त्यांच पोस्टिंग डेहराडूनला आहे तर मुलीचे वडील देखील सैन्यात डॉक्टर असून नागपूरमध्ये कार्यरत आहेत.दोन्ही बाजूच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली. सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी देखील लॉकडाऊनमधलं हे आगळं वेगळं लग्न पार पाडलं. हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी या लग्नाला हजर होते. पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी मनोज पाटील यांनी मुलीचं कन्यादान केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”