‘या’ भारतीय फलंदाजाला बाद करणे होते सर्वांत कठीण; ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेटलीचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे दिग्गज फलंदाज असलेले सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एका दशकापेक्षा जास्त काळ जगातील अनेक गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. या सर्व फलंदाजांनी मिळून जगातील सर्वात मजबूत गोलंदाजीविरूद्ध खोऱ्याने धावा केल्या.यापैकीच एक भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आहे ज्याने जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा सामना केला.

अलीकडेच आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने लक्ष्मणचा त्याचा आवडता फलंदाज म्हणून उल्लेख केला आहे.क्रिकेटच्या मैदानावर लक्ष्मण आणि ब्रेट ली यांच्यात चुरशीची झुंज पाहायला मिळाली आणि बहुतेक वेळा लक्ष्मणच सरस ठरायचा. म्हणूनच अजूनही ब्रेट लीचा भारताच्या या दिग्गज खेळाडूबद्दल मनापासून आदर बाळगून आहे. केवळ ब्रेट लीच नाही तर त्या काळातील सर्वच ऑस्ट्रेलियन खेळाडू लक्ष्मणचा आदर करत.

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये लक्ष्मणच्या फलंदाजीची आठवण ब्रेट लीने केली तो म्हणाला,“गोलंदाजांना त्याचे तंत्र समजणे फार कठीण होते, त्यांची खेळाची शैली खूप चांगली होती.त्याचे फुटवर्क अद्भुत होते. ”

Brett Lee, VVS Laxman - Brett Lee and VVS Laxman Photos - Third ...

म्हणूनच ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणचा रेकॉर्ड शानदार आहे. लक्ष्मणने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण २९ कसोटी सामने खेळले असून त्यात ४९.६१ च्या सरासरीने २४३४ धावा केल्या. या दरम्यान त्याने २००१ मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळलेल्या २८१ धावांच्या अविस्मरणीय व्दिशतकांसह एकूण ६ शतके केली.

केवळ कसोटीतच नाही तर लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाच्या वनडेमध्येही धमाकेदार खेळी केल्या. लक्ष्मणच्या या शानदार फलंदाजीचा अंदाज यावरूनच येतो कि एकदिवसीय मालिकेत त्याने एकूण ६ शतके ठोकलेली आहेत, त्यापैकी ४ शतके ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६.१८ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३१० आणि एकदिवसीय सामन्यात ३८० गडी बाद केले आहेत,तो म्हणाला,”लक्ष्मण हा एक हुशार फलंदाज होता ज्यामुळे गोलंदाजांना त्याला बाद करणे कठीण होत होते.”

ब्रेट ली म्हणाला, “लक्ष्मण एक असा फलंदाज होता जो धीर धरत क्रीजवर उभा रहायचा आणि संधीची वाट पहायचा.तो खूप हुशार होता आणि जेव्हा त्याच्या लयीमध्ये यायचा, तेव्हा त्याच्यासमोर कोण गोलंदाजी करीत आहे याने त्याला काही फरक पडत नव्हता.गोलंदाजांचे मन वाचण्यात लक्ष्मण खूप पारंगत होता.

VVS Laxman's incredible 281 in 2001 is the best I've seen against ...

ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या २८१ धावांच्या खेरीज लक्ष्मणने २००३ च्या अ‍ॅडलेड कसोटी सामन्यातही १४३ धावांची अविस्मरणीय खेळी केली. या सामन्यात भारतीय संघाने एका वेळी केवळ ८५ धावांच्या मोबदल्यात ४ गडी गमावले होते तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात भारतासमोर ५५६ धावांचा विशाल डोंगर उभा केला.

याच सामन्यात लक्ष्मणशिवाय राहुल द्रविडने भारतासाठी २३३ धावा केल्या होत्या, त्यामुळे भारतीय संघ ही कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला आणि हा सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी साधली.

Legends Month: The best of VVS Laxman | cricket.com.au

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

You might also like