पुष्पातील श्रीवल्ली सारखी दिसतेस म्हणत पुण्यातील तरुणीला मारली मिठी आणि मग….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील धनकवडी परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये धनकवडी परिसरातील दोन तरुणांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या दोन आरोपी तरुणांनी पीडित तरुणीला पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली संबोधून तिची छेड काढली आहे. या घटनेप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहेल आणि आरबाज अशी या दोन आरोपींची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी कि, पीडित तरुणी ही पुण्यातील धनकवडी या ठिकाणी राहायला आहे. काल रात्री हि तरुणी आपल्या घराजवळ थांबली असताना, आरोपी सोहेलने तरुणीला पाहत शिट्टी वाजवायला सुरुवात केली. यानंतर आरोपी सोहेलने तू पुष्पा चित्रपटातील हिरोईन श्रीवल्ली सारखी दिसतेस, मला तुझ्या सोबत लग्न करायच आहे असे म्हणत पीडित तरुणीला मिठी मारली.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने घाबरून आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर लगेच त्या पीडित तरुणीचा सख्खा भाऊ तिथे आला. यानंतर आरोपी सोहेल आणि अरबाज या दोघांनीही त्याला मारहाण केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी अरबाज आणि सोहेल यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.