पुण्यात पॉझिटिव्हीटी रेट वाढला; निर्बंधातून पुणेकरांची सुटका नाहीच

ajit pawar pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्ह्यात कोरोना काही प्रमाणात वाढला असून पॉझिटीव्हीटी रेट वाढला आहे. मागील आठवड्यात पुण्याचा पॉझिटीव्हिटी रेट हा 4.6 होता तर आता पुण्यातील पॉझिटिव्हिटीचा रेट 5.3 इतका झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. मागील आठवड्यात ज्या प्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. तेच निर्बंध येत्या आठवड्यात देखील लागू राहतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

काय आहेत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध –

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व दुकाने 4 पर्यंत खुली राहणार.

– यामध्ये मॉल्स (Mall) हे पूर्णपणे बंद राहणार आहेत.

– हॉटेल्सही 4 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

आठवड्याच्या शनिवार आणि रविवार फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहतील. इतर दुकाने बंद राहतील.

उद्याने, मैदाने, जॉगिंग , रनींग आठवड्यातील सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु राहतील

खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत

अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने