सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे ते कराड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एक महिला छोट्या बाळासमवेत प्रवास करीत होत्या. पुणे- बेंगलोर हायवेवर बाँम्बे रेस्टारंन्ट याठिकाणी काही प्रवासी उतरले. त्यानंतर सदरचे वाहन नागठाणे याठिकाणी गेल्यावर सदर महिलेस गाडीचे वर ठेवलेली बॅग नसलेबाबत दिसून आली. त्यांनी लगेच सदर वाहनाचे चालक यांना बॅग नसलेबाबत माहिती दिली. त्यानंतर बराच वेळ शोधाशोध केली, मात्र, बॅग न आढळल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांची शोधमोहिम सुरू असताना एका इसमाने 8 तोळे सोने असलेली बॅग प्रामाणिकपणे सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीतल इंद्रजित देसाई (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) या आपल्या लहान बाळासह प्रवास करीत होत्या. काही प्रवाशी साताऱ्यात हायवेवर उतरले. त्यानंतर गाडीतील शीतल यांना त्यांची बॅंग आढळून आली नाही. त्यांनी प्रवाशी उतरलेल्या ठिकाणी येवून शोधाशोध केली परंतू बॅग मिळून आली नाही. सदर बॅगेमध्ये सदर महिलेचे सुमारे 8 तोळे सोने हरविले असलेने त्यांनी तात्काळ एम. आय. डी. सी. पोलीस चौकीस आले. तेथील पो. हवा. अरूण दगडे, दिपक इंगवले, दिपक गुरव व डी. बी. पथकातील पोलीस स्टापने सदर ठिकाणची जावून प्रवाशी उतरलेल्या ठिकाणी माहिती घेवून एस. टी. बस व इतर खाजगी वाहनातील प्रवाशी चेक केले. परंतू सदरची बॅग मिळून आली नाही. तेव्हा शीतल यांनी अज्ञाताविरूदध तक्रार नोंद केलेली होती. पोलीसांनी सदर ठिकाणचे आसपास सीसीटीव्ही फूटेज तपासून बॅग घेवून जाणारे इसमाचे फूटेज प्राप्त करून त्याबाबत पोलीस सदर इसमाचा शोध घेत होते.
यावेळी रविंद्र गणपत चव्हाण (रा. प्लॉट नं. १३ रामरावपवार नगर, गोडोली, सातारा) व त्यांचा मुलगा अभिजीत चव्हाण यांनी सदर बॅगेतील सोन्याची पिवशी व डब्यावरील नाव व पत्ता यावरून सदर बॅगेचे मालकाची अत्यंत चिकाटीनी माहिती प्राप्त करून त्यांना सदरची बॅग मिळून आल्याचे सांगितले. व सदरची बॅग प्रामाणिकपणे सातारा शहर पोलीस ठाणेस हजर केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल फिर्यादी व मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांनी बॅग देणारे श्री. रविंद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केलेला आहे.