हेल्मेट ऐवजी तो चक्क कढई घालून चालवतो गाडी

Helmet Cumpulsion in Pune
Helmet Cumpulsion in Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | ‘पुणं तिथं काय उणं’ या उक्तीला साजेशी अशी घटना आज पुणेकरांना अनुभवायला मिळाली. नववर्षाच्या सुरवातीपासून म्हणजेच १ जानेवारी पासून पुण्यात वाहतूक विभागाकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली अाहे. नागरिकांच्या सुरक्षेकरता हेल्मेट न वापरणार्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अशात पुण्यातील एका वकीलाने हेल्मेट एवजी चक्क कढई डोक्यावर घालून दुचाकी चालवलणे पसंद केल्याचे समोर आले आहे. सदर वकिलाचा कढई डोक्यावर चढवलेला फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून पुणेकरांनी मात्र हेल्मेट सक्तीला आपला विरोध कायम ठेवला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर वकिलाचा हेल्मेट सक्तीला विरोध नसून निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटला विरोध आहे. हलक्या प्रतीचे हेल्मेट बाजारात विक्रीला असून त्या हेल्मेट वापराने काहीही सुरक्षा मिळत नाही असे त्या वकिलाचे म्हणणे आहे. तेव्हा अशा हलक्या प्रतिच्या हेल्मेट एवजी कढई बरी असे म्हणत सदर वकिलाने कढई डोक्यावर घालून शहरातून दुचाकी चालवत निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटचा निषेध केला आहे.

वाजेद खान बिडकर असे या वकिलाचे नाव आहे. दर्जा नसलेली हेल्मेट वापरणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करत नसल्याने या वकिलाने डोक्यावर कढई घालून शहरात बाईकवरून फिरायला सुरूवात केली आहे. वाहतूक पोलिसांनी बिडकर यांना अडवले तेव्हा ते त्यांच्यासोबत हुज्जत घालतात आणि त्यांचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करतात. हेल्मेट कसे असावे याची नियमावली नसल्याने डोक्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला या कढईचा वापर हेल्मेट म्हणून करू दिला जावा, अशी लेखी मागणीच त्यांनी पोलिसांकडे केली आहे. हेल्मेट कसे असावे याची नियमावली नसल्याने आपण हेल्मेटऐवजी कढई वापरू शकतो, असा या वकिलाचा दावा आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

पुण्यात एलिअन दिसला, पंतप्रधान कार्यालयाला पत्र!

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

दादा, मी प्रेग्नंट आहे, पुण्यात होर्डीग चर्चा