हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल ट्रेन 22 ऑगस्ट पर्यंत पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना महारामारीच्या काळात बंद करण्यात आलेल्या सर्व लोकल गाड्या अद्याप सुरु करण्यात आल्या नव्हत्या. परंतु 22 ऑगस्टपर्यंत सर्व 40 जोड्या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने चालवल्या जाणार आहेत. तसेच आणखी चार लोकल ट्रेन 8 ऑगस्टपासून सुरू होतील, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.
तसेच आणखी चार लोकल ट्रेन 8 ऑगस्टपासून सुरू होतील, तर सहा सेवा 15 ऑगस्टपासून सुरू होईल. 22 ऑगस्टपासून पुणे-लोणावळा मार्गावरील आणखी चार लोकल गाड्या पुन्हा सुरू होतील असे मनोज झंवर यांनी सांगितले. पुणे आणि मुंबई दरम्यानच्या गाड्यांप्रमाणे लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल गाड्या दोन्ही शहरांमधील सर्व स्थानकांवर थांबतील.
पुण्याहून धावणाऱ्या जवळपास 97 टक्के एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र काही गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत त्याही लवकरच सुरू होतील. दररोज सुमारे 40,000 ते 50,000 लोक या लोकलमधून प्रवास करतात. प्रवाशी संख्या जास्त असल्याने जास्तीच्या गाड्या हि काळाची गरज मानली जात आहे.