हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करत पुणे मेट्रोने (Pune Metro) पुण्यातील विध्यार्थ्यांसाठी खास योजना आणली समोर आणली आहे. ज्यानुसार पुणे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड” मिळवता येईल.” एक पुणे विद्यार्थी पास कार्ड ” च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मेट्रोच्या तिकीट दरात 30% सवलत मिळणार आहे.
“एक पुणे विद्यार्थी पास कार्ड “ही सुविधा 6 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून पुणे मेट्रोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळू शकेल . “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड ” बहुउद्देशीय कार्ड असून ज्याद्वारे विद्यार्थ्यांना कुठल्याही रिटेल पेमेंट साठी याचा वापर करता येऊ शकतो. देशात कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते . त्यात “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड ” हे कार्ड देखील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या नियमांचे पालन करते . त्यामुळे या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थी सुरक्षित पेमेंट करू शकतात. तसेच देशातील कुठल्याही बसेस किंवा मेट्रो मध्ये तुम्ही ह्या कार्डचा वापर करणे तुम्हाला सहज शक्य असेल.
“एक पुणे विद्यार्थी पास कार्ड ” कसे मिळेल
पुण्यातील कुठल्याही मेट्रो स्टेशन मधून तुम्ही हे कार्ड घेऊ शकता. तसेच पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून विद्यार्थी पास मिळवू शकतात. “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड ” हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड दाखवणे गरजेचे आहे. ज्या 13 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांकडे पॅन कार्ड नसेल त्या विद्यार्थ्यांना विशेष असा इ – फॉर्म भरून देणे गरजेचे आहे. तसेच “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड ” हा पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय 13 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
10 हजार विध्यार्थ्यांना मिळणार मोफत पास
सुरुवातीच्या 10 हजार विद्यार्थ्यांना हे कार्ड मोफत देण्यात असून त्यानंतर कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड “साठी 150 रु. रक्कम मोजावी लागेल. तसेच याबरोबरच 75 रु. वार्षिक शुल्क देखील द्यावे लागेल. सदर कार्ड हे भेटल्यावर पुढील तीन वर्ष्यासाठी वैध असेल.