पुण्यात सुरु होणार 3 नवे Metro मार्ग; अजितदादांनी दिले महत्त्वाचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : पुण्यातील काही मार्गावर मेट्रोचे काम पूर्ण झालं असून त्या मार्गावरून मेट्रो धावते आहे. मात्र काही मार्गावरील काम अजून अपूर्ण आहे. पुणे शहरातील मेट्रो मार्गांचा विस्तारीकरण करण्याचे काम आता गती पकडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या (Pune Metro) मार्गाच्या विस्तारीकरणाबाबत संबंधितांना काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहरात लवकरच मेट्रोचे काम पूर्ण होण्याची चिन्ह आहेत.

सध्या शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट आणि वनास ते रामवाडी यापैकी वनास रुबी हॉल क्लिनिक हे दोन मार्ग सुरू आहेत. या मार्गाचा उर्वरित भाग अर्थात सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी देखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत. अशातच शहरातील मेट्रोमार्गासंदर्भात (Pune Metro) महत्त्वाचे अपडेट हाती आले आहेत.

 महत्वाच्या मार्गिकांबद्दल सूचना

स्वारगेट – कात्रज आणि पिंपरी- निगडी मेट्रो मार्गीकांच्या विस्तारीकरणासंदर्भात महामेट्रो, राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्यात त्रिपक्षीय करार करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रोमार्गिकांचा म्हणजेच स्वारगेट ते लोणी काळभोर, हडपसर ते खराडी तसंच रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गीकांचा (Pune Metro) विस्तारीकरणाचा तांत्रिक अहवाल तयार करावा त्यासाठी सल्लागार नियुक्त करावा अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहेत.

याबरोबरच शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गीके अंतर्गत राजभवन इथे पादचरांसाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या आहेत. मात्र या सुधारित प्रकल्पास केंद्र शासनाचे मान्यता आवश्यक राहणाऱ्या या परिस्थितीत या सुधारित प्रकल्पास केंद्राकडून मान्यता मिळवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असा आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात मेट्रो (Pune Metro) संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी हे आदेश संबंधितांना दिले त्यामुळे आता पुणे शहरात लवकरच मेट्रोचा विस्तार होणार आहे.