वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Vasant More's son Rupesh More
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात धुळवडीचा सण साजरा केला जात असताना पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले असून याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे.

मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे असून त्याच्या मोबाईलवर अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज आला. त्यामध्ये तत्काळ 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा योगेश मोरे यांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसात या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सर्वत्र होळीचा उत्साह असतानाच वसंत मोरे यांच्या मुलाला अशी धमकी आली असून या धमकीमागे नेमके कोण आहे ? याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जात आहे.