अहमदनगर प्रतिनिधी। संगमनेर शहराजवळील पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात ३ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर अपघातात गणेश सुखदेव दराडे (वय-२९) रा. कर्हे, श्रीकांत बबन आव्हाड (वय-२८) रा. दरेवाडी, अजय श्रीधर पेदाम (वय-२७) हा रा. पांजरे, ता. चंद्रपूर यांचा मृत्यू झाला.
पुणे नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे वरून संगमनेरच्या दिशेने जात असताना कर्हे घाटात कार (एमएच.१९, बीजी ८१११) पुढे चाललेल्या ट्रकला (एमएच.१२, केपी १७९९) पाठीमागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिनही युवकांचा यात जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस हवलदार रफिक पठाण, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील तिघा युवकांना बाहेर काढलं. या भीषण अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बऱ्याचवेळ विस्कळीत झाली होती.
इतर काही बातम्या-
देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार
वाचा सविस्तर – https://t.co/kUBHK8TXg8@myogiadityanath @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis #VidhanBhavan #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019
मराठ्यांचं पाठबळ राष्ट्रवादीला तारणार का ? सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठींबा
वाचा सविस्तर –https://t.co/rXBO9hUSqo@NCPspeaks @AjitPawarSpeaks @NCPspeaks #maratha#marathakrantimorcha
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019
तर तेजस ठाकरे होणार ‘युवासेना प्रमुख’ ?
वाचा सविस्तर – https://t.co/hcTPm3k5gw@OfficeofUT @uddhavthackeray @ShivsenaComms @ShivSena #Politics #MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019