हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच प्रवाशांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवल्याचं कळाल्यानंतर प्रवाशांची चांगली घाबरगुंडी उडाली. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडेतिकडे सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी सुरु केली तसेच रेल्वे स्टेशन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. याशिवाय काही संशयास्पद वस्तू सापडतात का? यासाठी श्वानपथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.
सध्या रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती ओके मध्ये आहे. दरम्यान, हा धमकीचा फोन नाशिक येथील मनमाड मधून आल्याचे समजत आहे. याप्रकरणी संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक टीम मनमाडला रवाना झाली आहे. मात्र 26 जानेवारी तोंडावर असतानाच अशा प्रकारचा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.