हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी रेल्वे कडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांसाठी सोयी सुविधा वाढाव्यात यासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील असते. त्यातच आता शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि संत्रानगरी नागपूर या दोन शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी पुणे ते नागपूर दरम्यान सुपरफास्ट ट्रेन (Pune To Nagpur Train) सुरु झाली आहे. त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
5 नोव्हेंबर रोजी रुळावर धावली ट्रेन (Pune To Nagpur Train)
सध्या दिवाळीचा काळ सुरु असून अनेक जण सुट्ट्या असल्याने आपापल्या गावी जात आहेत. साहजिकच आरामदायी आणि स्वस्त प्रवास असलेल्या रेल्वेची मागणी वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे ते नागपूर ही सिंगल लाईन सुपरफास्ट ट्रेन 5 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर ही गाडी सुरु करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांची गर्दी होणार नाही. साधारणपणे पुण्याहुन नागपूरला जाणाऱ्या (Pune To Nagpur Train) प्रवाश्यांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे वाढणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
कसे असेल याचे वेळापत्रक?
रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. त्यासाठी गाडीचे वेळापत्रकही त्यांच्या सोयीनुसारच ठेवण्यात आले आहे. रविवारी ही गाडी दुपारी 4:00 वाजता पुण्याहुन रवाना होऊन नागपूरला पोहचेल. त्यानंतर ही गाडी सोमवारी 6:50 ला सकाळी नागपूरहुन निघेल आणि पुण्याला पोहचेल.
कोणत्या स्थानकांना भेट देईल गाडी?
पुणे ते नागपूर ही सुपरफास्ट रेल्वे (Pune To Nagpur Train) अहमदनगर, मनमाड, धामणगाव, बेलापूर, उरुळी, कोपरगाव, मलकापूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, शेगाव या ठिकाणी जाईल. त्यामुळे येथील नागरिकांनाही प्रवासासाठी कोणतीही अडचण येणार नाही. या गाडीची फेरी ही एकदाच होणार असली तरीही दिवाळीच्या तोंडावर घेण्यात आलेला हा निर्णय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरत आहे.