Pune Tourism : सिंहगड पर्यटकांसाठी खुशखबर! वनविभागाने आणली ऑनलाइन तिकिट सेवा

Pune Tourism sinhgad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरात सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची (Pune Tourism) संख्या सर्वात जास्त आहे. रोज हजारो पेक्षा जास्त पर्यटक सिंहगड चढत असतात. पावसाळ्यामध्ये तर ही संख्या आणखीन दुप्पट होऊन जाते. तर शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी ही संख्या चौपट वाढते. त्यामुळे सिंहगड मार्गावर तसेच गडावर गर्दी देखील तितकीच होते. आणि या गर्दीत सिंहगडावर आलेल्या पर्यटकांची गैरसोय होऊन बसते. यामध्ये बराच वेळ तिकीट काढण्यासाठी उभे राहावे लागल्यामुळे पर्यटक वैतागून जातात. या सर्व गोष्टींवर एक उपाय म्हणून पुणे वन विभागाने उत्तम सुविधा आणली आहे.

ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा- (Pune Tourism)

सिंहगड मार्गावर होणाऱ्या गर्दीमुळे पर्यटकांचे हाल होऊ नये यासाठी सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याची सुविधा वन विभागाने सुरू केली आहे. पुणे वनविभागाकडून ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांचे हाल होणार नाहीत. तसेच, कोणत्याही पर्यटकावर जास्त वेळ रांगेत राहून तिकीट काढण्याची वेळ येणार नाही. यापूर्वी सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांना तिकीट काढण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र वनविभागाने आणलेल्या या सुविधेमुळे तिकीट काढत्या वेळीचा गोंधळ थांबणार आहे.

मागील आठवड्यापासून सुविधा सुरू-

मागील आठवड्यापासून सिंहगड गडावर जाण्यासाठी आता तिकीटासाठी ऑनलाईन बुकींगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या काळात 600 पर्यटकांनी ऑनलाइन शुल्क भरले आहे. तर ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून एकूण 38 हजार 750 रुपयांचे उत्पन्न वन विभागाला मिळाले आहे. ही सेवा सुरू केल्यामुळे याचा दिलासा पर्यटकांना देखील तितकाच मिळाला आहे. या पर्यायामुळे पर्यटक (Pune Tourism) आता घर बसूनच ऑनलाईन बुकिंग करू शकतात. यासाठी त्यांना गडावर जाऊन रांगेत उभे राहायची वेळ येत नाही.

इथे करा बुकिंग-

ज्या पर्यटकांना सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करायचे आहे ते https://www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकतात. यावेळी त्यांना शुल्क भरावे लागते. तसेच, सर्व प्रोसेस केल्यानंतर त्यांना तिकिट मिळते. मात्र ही प्रक्रिया ते सिंहगडावर जाण्यापूर्वीच करू शकतात. यासाठी त्यांना रांगेत उभे राहायची वेळ येत नाही. या सुविधेमुळे आता पर्यटक व्यवस्थितपणे आपल्या ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात.