हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहेत. आज पुणे (Pune) येथील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगलोर महामार्गावरून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक खाजगी ट्रॅव्हल साताऱ्याच्या दिशेहून मुंबईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पाठीमागून ट्रॅव्हलला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि यामध्ये ट्रॅव्हल आणि ट्रक दोन्हीही पलटी झाले. या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत, तर 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra | Four dead, 22 others injured in a collision between a truck and a private bus on Pune–Bengaluru Highway near Narhe area of Pune city around 3 am today. The injured are being treated at a hospital. pic.twitter.com/CH9tJRWnAa
— ANI (@ANI) April 23, 2023
ट्रकचालकाचे ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर पोलिसानी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तसेच वैद्यकीय आपत्कालीन सेवा दलाने घटनास्थळी पोचून पीडितांना मदत केली. या अपघातामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती मात्र बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग मोकळा करण्यात आला.