Rohit Sharma ने रचला इतिहास!! IPL मध्ये 250 Six मारणारा पहिला भारतीय ठरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्धचा सामना गमावला असला तरी कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड केला आहे. रोहित आयपीएलच्या इतिहासात 250 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आता त्याच्यापुढे फक्त ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलिअर्स यांचा नंबर आहेत. गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत तब्बल 357 षटकार मारले आहेत. तर एबी डिव्हिलिअर्सने 251 षटकार ठोकले आहेत.

काल रात्री पंजाब विरुद्धच्या सामन्यात रोहितने 27 चेंडूत 44 धावांची धडाकेबाज खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीनंतर त्याने आयपीएल मध्ये २५० सिक्स मारण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. या दमदार माईलस्टोन नंतर रोहितला हिटमॅन का म्हणतात हे सुद्धा सिद्ध झालं. रोहितनंतर महेंद्रसिंग धोनी (235 षटकार) आणि विराट कोहली (229 षटकार) यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, वानखेडेवर रंगलेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात सर्व प्रयत्न करूनही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 8 बाद 214 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिड यांनी मुंबईच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना अर्षदिप सिंगने घातक गोलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला.