पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरु

Pune University bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर. त्यामुळे पुणे विद्यापीठात जाण्यासाठी सर्वच विद्यार्थी मेहनत करतात. पुणे विद्यापीठाचा एकूण एरिया हा 411 एकरवर वसलेला आहे. येथे प्रत्येक विषयांचे स्पेशल डिपार्टमेंटदेखील आहे. परंतु एवढा भव्य दिव्य परिसर असल्यामुळे प्रत्येक विभागाला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना, सेवकांना तसेच शिक्षकांना अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे विद्यापीठाणे आता विद्यापीठाच्या क्षेत्रात मोफत बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

10:30 वाजेपासून सुरु होईल बस

विद्यापीठातील ज्या प्राध्यापक, सेवक व विद्यार्थ्यांकडे वाहन नाही अश्यांना विद्यापीठातील सर्व महत्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सकाळी 10:30 वाजेपासून या बसची सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा वेळ वाचणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने यासाठी एकूण दोन बस दिल्या आहेत. ज्या एकूण 13 थांब्यावर थांबतील. या बस मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर थांबणार आहेत. त्यामुळे या गोष्टीला प्रतिसाद कसा मिळतो यावरून बस थांब्याची संख्या वाढवली जाणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

कुठे कुठे असेल थांबा?

ही बस सेवा विद्यापीठात दर अर्ध्या तासाला असणार आहे. ज्यामध्ये विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयकर ग्रंथालय, रसायनशास्त्र विभाग, परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतिगृह, आरोग्य केंद्र, पुम्बा, मुलांचे वसतिगृह, मुख्य प्रवेशद्वार. असे बस स्टॉप असणार आहेत. येथून विद्यार्थी, कर्माचारी तसेच प्राध्यापक यांना घेऊन ही गाडी विद्यापीठात चालवली जाणार आहे. त्यामुळे ही विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापक यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

बससाठी असेल विद्यापीठाचे ऍप

विद्यापीठाचा परिसर मोठा असल्यामुळे बस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, किती वेळात ती कोणत्या थांब्यावर येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी विद्यापीठ बससाठी एक ऍप सुरु करणार आहे. अशी माहिती विद्यापीठाचे कुलूगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली आहे.

CNG बसेसद्वारे सुरु होणार ही सेवा

विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच प्राध्यापक यांच्याकडे वाहन नसल्यामुळे पायपीट व्हायची. मात्र आता ती थांबली जाणार आहे. कारण परिसरात मोफत बस सेवा सुरु केली जाणार आहे. ज्यामुळे पायपीट तसेच वेळ वाचणार आहे. तसेच या बस CNG असल्यामुळे पर्यावरणाला याचा फायदा होणार आहे. तसेच या इको – फ्रेंडली सेवेचा लाभ सर्वांनी जास्तीत – जास्त लोकांना होईल असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी सांगितले आहे.