मुंबई प्रतिनिधी | पुण्यातील कोंढवा येथे भिंत खचून झालेल्या अपघातात १६ व्यक्ती ठार झाले आहेत. या भीषण प्रकार महानगरपालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे असा गंभीर आरोप अजित पवार यांनी आज विधान सभेत केला. त्याच प्रमाणे या प्रकारात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
कोंढव्यात सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारतीच्या संरक्षक भिंती शनिवारी मध्यरात्री कोसळली. या भिंतीच्या पडझडीची माहिती संबंधित सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी महानगरपालिका आणि पोलिसात दिली होती. मात्र पोलीस आणि महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. असा आरोप अजित पवार यांनी आज विधानसभेत केला आहे.
अशा घटना घडल्यानंतर चर्चा होते आणि प्रकरण पुन्हा शांत होते. मात्र या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करावी म्हणजे कोट्यावधी रुपये कमवाऱ्या बिल्डर लोकांवर चांगला चाप बसेल असे अजित पवार म्हणाले आहेत.