कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील मलकापूर येथे मलकापूर नगरपंचायत व पोलिसांच्या समन्वयाने कारवाईची मोहिम राबविण्यात आली होती.
कराड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात 4 ते 10 मे या दरम्यान कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत किराणामाल, बेकरी, चिकन, मटन शाॅप हे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांना घरपोच सेवा देण्याची सवलत दिली आहे. तरीही मलकापूरमध्ये काही दुकानदार चोरीछुपे ग्राहकांना दुकानातूनच माल पुरवत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मलकापूर नगरपंचायतीच्या व्यवसाय विभाग तसेच कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने अशा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मलकापूर शहरातील पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत नगरपंचायतीचे रमेश बागल, अंकुश गावडे, सुनील शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव यांचा सहभाग होता. व्यवसायिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून नागरिकांना घरपोच सुविधा द्याव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba