हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील पुरंदर विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे. येत्या आठवडाभरात विमानतळासाठी भूसंपादनाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्चाधिकार समितीची बैठक अपेक्षित असून यांनतर जिल्हा प्रशासन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करू शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
पुढील आठवड्यात उच्चाधिकार समितीची बैठक होईल. या बैठकीत समिती विकासाचा हेतू जारी करेल (IOD). सर्वेक्षणाचे परिणाम दर्शविणारा MIDC चा संदेश खालीलप्रमाणे असेल. हे सर्वेक्षण क्रमांक वापरून जमिनीचे कोणतेही व्यवहार अधिसूचना पाठवल्यानंतर संपतील. चर्चेनंतर जिल्हा प्रशासन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करू शकते अशी माहिती सौरभ राव यांनी दिली.
दरम्यान, पुरंदर येतील नियोजित आंतराष्ट्रीय विमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजेवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील 2832 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. आता भूसंपादनासोबतच मोबदल्याची रक्कम लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुरंदर विमानतळासोबतच बहुउद्देशीय माल वाहतूक व साठवणूक केंद्र (मल्टिमोडल लॉजिस्टिक हब) प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरी उड्डाणांसोबतच आयात-निर्यातीला चालना आणि लाखो रोजगार निर्माण होणार आहेत.