वृत्तसंस्था | रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केलेल्या पी.व्ही.सिंधूने आज भारतीय लोकांविषयीच आपलं मत व्यक्त केलं. भारतीय लोक सभांमध्ये खूप गप्पा मारताना दिसतात. कौटुंबिक चर्चेवेळी सुद्धा स्त्रियांच्या वागणुकीविषयी काळजी व्यक्त करतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जो सन्मान त्यांनी स्त्रियांना द्यायला हवा तो कधीच देत नाहीत. इतर देशांमधील लोकांमध्ये महिलांच्या प्रति असणारा सन्मान मी स्वतः पाहिला आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा मला आनंदच होतो.
भारतातील मी टू चळवळीविषयी बोलताना सिंधू पुढे म्हणाली, या चळवळीने देशाला अधिक साक्षर केलं आहे. तसेच स्त्रिया व पुरुष दोघांनाही समाजाप्रति असणाऱ्या त्यांच्या जबाबदाऱ्यांचं भान आणून दिलं आहे.
https://twitter.com/ANI/status/1086475553039884288?s=19
इतर महत्वाचे –
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर येणार बॉलिवूडमध्ये?
हार्दिक पांड्या करणार आता बँकिंग परीक्षेचा अभ्यास ??