QR कोड वरून पेमेंट करत असाल तर या गोष्टी जाणून घ्या! नुकसान टाळा

QR Code
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल खूप लोक ऑनलाइन पेमेंट करत आहेत. ऑनलाइन पेमेंट जसे जसे जास्त प्रमाणात वाढते आहे तसे यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हा घडत आहे. ऑनलाइन पेमेंटमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करणे अतिशय सोपे असल्यामुळे, लोक क्यूआर कोडचा जास्त वापर करत असतात. दुकान आणि पेट्रोल पंपासमोर लावलेले क्यूआर कोड स्कॅन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सध्या हा फ्रॉड भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. जाणून घेऊ क्यूआर कोड मार्फत कशाप्रकारे फिशिंग घडवून आणली जाते याबाबत.

फिशिंग करणारे लोक व्हाट्सअपवरती क्यूआर कोड पाठवून लोकांना स्कॅन करून, बक्षीस मिळवण्याचे आमिष दाखवतात. वापरकर्त्यांना खोटी आमिषे दाखवली जातात. ते अमुक-अमुक किमतीचे बक्षिसे जिंकली आहेत असे त्यांना सांगितले जाते. यावर बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यासाठी युपीआय पिन मागितला जातो. स्कॅन करून युपीआय पिन टाकल्याबरोबर वापरकर्त्याच्या अकाउंटमधून पैसे कट होऊन फिशिंग करणारच्या अकाउंटमध्ये जमा होतात.

क्यूआरकोड वरून स्कॅन करून पेमेंट पाठवणे अतिशय सोपे असल्यामुळे लोक त्याचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसून येतात. यासोबतच, यामध्ये फसवणुकीचाही मोठा धोका असल्याचे दिसून आले आहे. यामुळे कुठल्याही क्यूआर कोड स्कॅन करण्याआधी व्यवस्थित त्याची माहिती घ्या. जेणेकरून आपण फसले जाऊ शकणार नाहीत. पेमेंट करताना जर काही शंका आल्यास तातडीने सायबर सेलशी संपर्क साधा.